lirikcinta.com
a b c d e f g h i j k l m n o p q r s t u v w x y z 0 1 2 3 4 5 6 7 8 9 #

ghal ghal pinga varya - suman kalyanpur lyrics

Loading...

घाल घाल पिंगा वार्या माझ्या परसात
माहेरी जा सुवासाची कर बरसात!

“सुखी आहे पोर”- सांग आईच्या कानात
“आई, भाऊसाठी परि मन खंतावतं!

विसरली का ग भादव्यात वर्स झालं,
माहेरीच्या सुखाला ग मन आचवलं.

फिरुन-फिरुन सय येई जीव वेडावतो
चंद्रकळेचा ग शेव ओलाचिंब होतो.

काळ्या कपिलेची नंदा खोडकर फार,
हुंगहुंगुनिया करी कशी ग बेजार!

परसात पारिजातकाचा सडा पडे,
कधी फुलं वेचायला नेशील तू गडे?

कपिलेच्या दुधावर मऊ दाट साय
माया माझ्यावर दाट जशी तुझी, माय…!”

आले भरून डोळे पुन्हा गळा नि दाटला
माउलीच्या भेटीसाठी जीव व्याकूळला!

Random Song Lyrics :

Popular

Loading...