lirikcinta.com
a b c d e f g h i j k l m n o p q r s t u v w x y z 0 1 2 3 4 5 6 7 8 9 #

dhund yeth mee - sudhir phadke lyrics

Loading...

धुंद येथ मी स्वैर झोकितो मद्याचे प्याले
धुंद येथ मी स्वैर झोकितो मद्याचे प्याले
याचवेळी तू असशिल तेथे बाळा पाजविले

धुंद येथ मी

येथे विजेचे दिवे फेकती उघडयावर पाप
ज्योत पणतीची असेल उजळीत तव मुख निष्पाप
माझ्या कानी घुमती गाणी मादक मायावी
ओठावरती असेल तुझिया अमृतमय ओवी
धुंद येथ मी

माझ्यावरती खिळली येथे विषयाची दृष्टी
मत्पूजेस्तव असशिल शोधित सखे स्वप्नसृष्टी
कनकांगीच्या मत्त चुंबने जाग मला आली
विरहाश्रू तव असेल झरला सुकलेल्या गाली
धुंद येथ मी

तुझे नि माझे अंतर व्हावे कसे एकरूप
शीलवती तू पतिव्रते
शीलवती तू पतिव्रते, मी मूर्तीमंत पाप
धुंद येथ मी स्वैर झोकितो मद्याचे प्याले
धुंद येथ मी

Random Song Lyrics :

Popular

Loading...