lirikcinta.com
a b c d e f g h i j k l m n o p q r s t u v w x y z 0 1 2 3 4 5 6 7 8 9 #

kalika kashya ga bai - padmaja fenani joglekar lyrics

Loading...

कालिका कशा गं बाई भूलल्या
kalika kasha ga bai bhulalya

इवल्या फुलात बाई फुलल्या
evlya fulat bai fulalya

सजून धजून बाई भरात कलली जाई
(लाजून बुजून बाई, उरात फुलली जुई)

फुलली जाई, फुलली जुई
(जाई जुई
जाई जुई)

फुलल्या कशा गं बाई फुलल्या
इवल्या फुलात बाई फुलल्या

कोरस

अवखळ वाऱ्यात, अवखळ वाऱ्यात
काळोख बाकी
थरथर पानात भरून राही
(सलज्ज कोवळ्या, सलज्ज कोवळ्या जाई जुईच्या)
मनात चांदणे चोरून पाहे

भवती काजळी राई, धवल ठसली जाई
तमाळ रंगात काही विभोर हसली जाई

झुलली जाई, झुलली जुई
(जाई जुई
जाई जुई)

झुलल्या कशा ग बाई झुलल्या
इवल्या फुलात बाई फुलल्या

मुग्ध हरपल्या कुपीत
चित्त चोर गंध कोरला

लुब्ध उकलता गुपित
ओसंडून मुक्त नांदला

(नितळ निवांत पाही नाजूक साजूक जाई)
झाकून तळावी राही, मिटून लोचनं जुई

डुलली जाई डुलली जुई
(जाई जुई, जाई जुई)
डूलल्या कशा गं बाई डुलल्या
इवल्या फुलात बाई फुलल्या

कोरस…

रात्र संपली, निळी उषा सुरम्य रंग रंगली
माळ गुंफली, पहाट पाकळ्या कळ्यात दंगली

ढळल दिशात दाही, नाचली मोहक जाई
वळल्या नभात वाही सुगंध साजिरी जुई

कळली जाई, कळली जुई
जाई जुई, जाई जुई

कळल्या कशा गं बाई कळल्या
(झुलल्या कशा गं बाई झुलल्या)
कालिका कशा गं बाई भूलल्या
(फुलल्या कशा गं बाई फुलल्या)

Random Song Lyrics :

Popular

Loading...