lirikcinta.com
a b c d e f g h i j k l m n o p q r s t u v w x y z 0 1 2 3 4 5 6 7 8 9 #

tu jithe mi tithe - neha rajpal feat. swapnil bandodkar lyrics

Loading...

तू जिथे मी तिथे
स्वप्न वेडे हमम आता
स्पर्श-ओल्या हमम वाटा

मी न माझी राहिले आता

सहज सोपे ह्या उन्हाचे त्या धुक्याला बिलगणे
हे असे माझे तुझे अन् त्या ढगांवर चालणे
हो सहज सोपे ह्या उन्हाचे त्या धुक्याला बिलगणे
हे असे माझे तुझे अन त्या ढगांवर चालणे
शोधते स्वतःला भेटुनी तुला
पण रस्ते नवे नेती कुठे नाही कळे मला

तू जिथे मी तिथे
स्वप्न वेडे पाहिले आता
स्पर्श-ओल्या मोकळ्या वाटा
मी न माझी राहिले आता

हो सहज सोपे ह्या उन्हाचे त्या धुक्याला बिलगणे
हे असे माझे तुझे अन त्या ढगांवर चालणे

गुणगुणावे मी तुला मग तू मलाही सुचावे
बोलुनी झाले तरीही खूप काही उरावे
गुणगुणावे मी तुला मग तू मलाही सुचावे
बोलुनी झाले तरीही खूप काही उरावे
हो. बोलणे नको हे सांगणे आता
पण मग आपुल्या मौनास काही अर्थ ये नवा

तू जिथे मी तिथे
स्वप्न वेडे पाहिले आता
स्पर्श-ओल्या मोकळ्या वाटा
मी न माझी राहिले आता

हो सहज सोपे ह्या उन्हाचे त्या धुक्याला बिलगणे
हे असे माझे तुझे अन त्या ढगांवर चालणे

अंतरे संपून जावी, विरघळावे दुरावे
कोण होतो काय झालो ना मिळावे पुरावे….

हो.अंतरे संपून जावी, विरघळावे दुरावे
कोण होतो काय झालो ना मिळावे पुरावे
सांगणे सुखाचे ऐकवू जगा
पण मग आपुल्या नात्यास काही अर्थ ये नवा

तू जिथे मी तिथे…
स्वप्न वेडे पाहिले आता
स्पर्श-ओल्या मोकळ्या वाटा
मी न माझी राहिले आता
हो.तू जिथे मी तिथे
तू जिथे मी तिथे
ओ.स्वप्न वेडे हं.हं.हं आता
स्पर्श-ओल्या हं.हं.हं. वाटा
मी न माझी राहिले आता….

– जीवन बहिरमकर, दापोली

Random Song Lyrics :

Popular

Loading...