lirikcinta.com
a b c d e f g h i j k l m n o p q r s t u v w x y z 0 1 2 3 4 5 6 7 8 9 #

dukh na anand hi - lata mangeshkar lyrics

Loading...

दुःख ना आनंदही अन् अंत ना आरंभही,
नाव आहे चाललेली कालही अन् आजही.

मी तसा प्रत्यक्ष नाही, ना विदेशी मी जसा,
मी नव्हें की बिंब माझें! मी न माझा आरसा.

याद नाही, साद नाही, ना सखी वा सोबती,
नाद आहे या घड्याला अन् घड्याच्या भोवती.

सांध्यछाया आणि काया जोडुनी यांचा दुवा
नाव आहे चाललेली, दूरची हाले हवा.

एकला मी नाहि जैसा, नाहि नाहि मी दुणा
जीवनाला ऐल नाही, पैल, तैसा मध्य ना.

Random Song Lyrics :

Popular

Loading...