lirikcinta.com
a b c d e f g h i j k l m n o p q r s t u v w x y z 0 1 2 3 4 5 6 7 8 9 #

thav lagna - harshawardhan wavare lyrics

Loading...

काजव्याचं रान सारं पान्यावरती पेरलं
दाटलेलं हसु गुलाबी आभाळावर कोरलं
लाजाळूची लाज आली डोळ्यामंदी आज

बिलगून जावं मीच माझ्या सावलीला
ठाव लागंना जीवाला ठाव लागंना ह्यो…

कळना वळना… पापनी का हलना
सपानं भिर भिर मनाला…
रुसलं हिरमुसलं… कुनाच्या गं भेटीला
कुनाच्या बाई बाई भेटीला
सुखाचा ह्यो साज भुलवी मनाला गं आज
बिलगून जावं मीच माझ्या सावलीला
ठाव लागंना जीवाला ठाव लागंना ह्यो…

सोन्याची झळाळी… कोवळ्या ह्या उनाला
नवालं सांगू कुनाला…
फुलाचा झुला गं. ओढणीच्या गाठीला
गाठीला बाई बाई गाठीला…
चांदन्याची बाग माझ्या येई मागोमाग
बिलगून जावं मीच माझ्या सावलीला
ठाव लागंना जीवाला ठाव लागंना ह्यो…

Random Song Lyrics :

Popular

Loading...