lirikcinta.com
a b c d e f g h i j k l m n o p q r s t u v w x y z 0 1 2 3 4 5 6 7 8 9 #

reshmachya reghani - asha bhosle & anandghan lyrics

Loading...

रेशमाच्या रेघानी, लाल-काळ्या धाग्यांनी
कर्नाटकी कशिदा मी काढिला
हात नगा लावू माझ्या साडीला

रेशमाच्या रेघानी, लाल-काळ्या धाग्यांनी
कर्नाटकी कशिदा मी काढिला
हात नगा लावू माझ्या साडीला

नवी कोरी साडी लाख मोलाची
भरली मी नक्षी फूल वेलाची
नवी कोरी साडी लाख मोलाची
भरली मी नक्षी फूल वेलाची
वेलाची, मी वेलाची

गुंफियलं राघूमोर, राघूमोर जोडीला
हात नगा लावू माझ्या साडीला
हात नगा लावू माझ्या साडीला

जात होते वाटनं मी तोऱ्यात, मी तोऱ्यात
जात होते वाटनं मी तोऱ्यात, मी तोऱ्यात
अवचित आला माझ्या होऱ्यात, मी होऱ्यात

तुम्ही माझ्या पदराचा शेव का हो ओढीला?
हात नगा लावू माझ्या साडीला
हात नगा लावू माझ्या साडीला

भीड काही ठेवा आल्या-गेल्याची
मुरवत राखा दहा डोळ्यांची
भीड काही ठेवा आल्या-गेल्याची
मुरवत राखा दहा डोळ्यांची
डोळ्यांची, बाई डोळ्यांची

काय म्हणू बाई, बाई तुमच्या या खोडीला
हात नगा लावू माझ्या साडीला
हात नगा लावू माझ्या साडीला

Random Song Lyrics :

Popular

Loading...