lirikcinta.com
a b c d e f g h i j k l m n o p q r s t u v w x y z 0 1 2 3 4 5 6 7 8 9 #

original - arun date feat. suman kalyanpur lyrics

Loading...

पहिलीच भेट झाली, पण ओढ ही युगांची
जादू अशी घडे ही या दोन लोचनांची

पहिलीच भेट झाली, जडली अपूर्व बाधा
स्वप्नात गुंग झाली जागेपणात राधा
माझी न रहिले मी, किमया अशी कुणाची?

डोळे मिटून घेता दिसतेस तू समोर
फुलवून पंख स्वप्नी अन् नाचतात मोर
झाली फुले सुगंधी माझ्याहि भावनांची

लाजून वाजती या अंगातुनी सतारी
ऐश्वर्य घेउनी हे ये दैव आज दारी
मी लागले बघाया स्वप्नेहि मीलनाची

वार्यात ऐकतो मी आता तुझीच गाणी
तार्यांत वाचतो अन् या प्रीतिची कहाणी
पहिलीच भेट झाली, पण ओढ ही युगांची
जादू अशी घडे ही या दोन लोचनांची

Random Song Lyrics :

Popular

Loading...