lirikcinta.com
a b c d e f g h i j k l m n o p q r s t u v w x y z 0 1 2 3 4 5 6 7 8 9 #

tuzi athavan (from "miss u mister") - alap desai & anandi joshi lyrics

Loading...

ओ….
पावसाच्या सरी परी
येणे जाने तुझे

ओल्या चिंब ओठांवरी
ओले गाणे तुझे

ओ….
पावसाच्या सरी परी
येणे जाने तुझे
ओल्या चिंब ओठांवरी
ओले गाणे तुझे

मोहरल्या मातीतले अत्तर तू
देहातल्या कविताचे अक्षर तू
माझ्या मनी गुंतलेले
असे तुझे मन…
माझ्या मनी गुंतलेले
असे तुझे मन…
जिथे जिथे जावे तिथे
तुझी आठवण …….

जेव्हा जेव्हा येतो तुझ्या
दिशातून वारा
अनावर लाटांवर
डोलतो किनारा

पुन्हा माझ्या वाळूवर
नाव तुझे
पावलांचे ठसे भर
धाव तुझे

परतीच्या वाटेलाही
तुझे च वळण…
परतीच्या वाटेलाही
तुझे च वळण…
जिथे जिथे जावे तिथे
तुझी आठवण ………

अचानक गर्दीतही
वाटते एकटे
भरलेले शहर हे
होते रिते रिते

ओळखीची अनोळखी
खून ही तू
खून ही तू माझी
चाहूल ही तू

जागोजागी विखुरलेले
माझे मी पण…
जागोजागी विखुरलेले
माझे मी पण…
जिथे जिथे जावे तिथे
तुझी आठवण …….
तुझी आठवण …….
ओ….
तुझी आठवण …….
तुझी आठवण …….
ओ….
तुझी आठवण …….

Random Song Lyrics :

Popular

Loading...